AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसचे जुब्ली हिल्स मतदारसंघातील उमेदवार नवीन यादव यांना विधानसभेच्या पोटनिवडणुक करिता समर्थन जाहीर केले आहे.
AIMIM Gives Support To Congress In Telagana Assembly Bye-Election :-
तेलंगणा मध्ये जुब्ली हिल्स विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक करिता AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस चे उमेदवार नवीन यादव यांना समर्थन जाहिर केले आहे. हैद्राबाद मधील शकीपेट येथे काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांची भेट घेत पाठिंबा जाहिर केला आहे.
.
भारत राष्ट्र समिती ने मतदारसंघ कडे दुर्लक्ष केलं
" भारत राष्ट्र समिती तेलंगणा मध्ये 10 वर्ष सत्तेत होती. परंतु, त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री कडे संधी असूनही मतदारसंघात काहीच विकास करू शकले नाहीत. या मतदारसंघात ३,९८,८७० मतदार या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघाला विकास आवश्यक आहे. भारत राष्ट्र समितीने जर जुब्लि हिल्स मतदारसंघात 2023 मध्ये तिकीट दिले नसते. तर, ही पोटनिवडणूक घ्यायची गरज पडली नसती. भारत राष्ट्र समितीने तेलंगणाचे दहा वर्ष वाया घालवले," असे MIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
भारत राष्ट्र समिती चे माजी आमदार मागंटी गोपीनाथ यांचे निधन ०८ जून २०२५ ला झाल्याने ही जागा रिक्त झाली. ते या मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होते. त्यामुळे पोटनिवडणूक घेणे गरजेचे आहे.
"AIMIM ची कामगिरी हैद्राबाद मध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. ओवेसींनी स्पष्ट सांगितले की, आमचं काँग्रेस चे उमेदवार यांना पाठिंबा असून, त्यांना जिंकवण्या करिता कटिबद्ध आहोत."
आजच काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केला.
काँग्रेस उमेदवार ने आज उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर रॅली काढून, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यादरम्यान कार्यकर्त्यांनी हाती झेंडे घेतले आणि जल्लोषात नवीन यादव यांनी आज अर्ज सादर केला.

0 टिप्पण्या