पुण्यातील नामांकित कॉलेज मुळे एका युवकाला त्याची नोकरी गमवावी लागली आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवकाने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा जातीवाद झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.
Viral Video Of Ex-Student From Pune District College :-
पुण्यातील नामांकित महाविद्यालय मध्ये जातीवाद झाल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. लंडन मध्ये काम करणाऱ्या तरुणाने हा आरोप केलाय. पुण्यातील कॉलेज मुळे माझी जॉब गेली, असा आरोप युवकाने केला आहे. प्रेम बिऱ्हाडे असं त्या तरुणांचं नाव आहे.
ज्या कंपनी मध्ये तरुणाला नौकरी लागली त्याच कंपनीने पुण्याच्या कॉलेज ला विचारले की, संबंधित विद्यार्थी तुमच्या कॉलेज चा विद्यार्थी होता का? त्यावर कॉलेज ने काहीच न उत्तर दिल्याने माझी हातची नौकरी गेली, असा युवकाचा आरोप आहे.
याच कॉलेज ने विद्यापीठात प्रवेश घेताना २ शिफारस पत्र दिले होते. परंतू, यावेळेस कॉलेज ने कंपनी ला का माहिती दिली नाही, असा सवाल युवकाने कॉलेज ला केला आहे. तसेच, आम्ही तुम्हाला पुढे गेलेले पाहवत नाही असा आरोपही युवकाने केला आहे.
हे फक्त ओळखपत्र नव्हतं. तर, हा माझा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष होता. असा तो तरुण व्हायरल व्हिडिओ मध्ये म्हणतोय. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश देत, तो तरुण म्हणाला की, " शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे."
व्हायरल व्हिडिओ मध्ये काहींनी टीका केली आहे. तर, काही जण युवकाचे समर्थन करत आहे. काहींनी तुम्हाला यापेक्षाही दुसरी मोठी नौकरी भेटेल, असं म्हटलंय. तर, एकाने "इतकं सगळं झाल्यावर पण किती शांत आणि नम्र बोलत आहे" असं म्हटलंय. तर, एकाने "आम्ही संबंधित कॉलेज ला जाब विचारायला आलोय. पुढील कारवाई सगळयांना कळवू." असे म्हटले आहे.
त्याच्या या व्हायरल व्हिडिओ वरून केलेल्या आरोप वरून चांगलीच खळबळ उडाली आहे. Prem Birhade या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा विडिओ शेअर करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या