Hot Posts

6/recent/ticker-posts

बाँबे उच्च न्यायालयाचा व्यक्तिमत्वाच्या अधिकार प्रकरणी अक्षय कुमारला मोठा दिलासा


 मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेते आणि खीलाडियो के खिलाडी अक्षय कुमार यांना मोठा दिलासा दिला असून, व्यक्तिमत्वाच्या अधिकार प्रकरणी अंतरिम संरक्षण दिले आहे. 




Mumbai High Court Gives Big Relief To Actor Akshay Kumar :- 


मुंबई उच्च न्यायालयाच्या अभिनेता अक्षय कुमार ला मोठा दिलासा दिलेला आहे. अभिनेता अक्षय कुमारला तत्काळ व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांवर तात्काळ अंतरिम संरक्षण दिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स साइट्स आणि एआय व्दारे कंटेंट निर्माण करणाऱ्यांना अक्षय कुमारचे नाव, प्रतिमा (Images) आणि आवाज परवानगी शिवाय वापर करण्यास नकार दिला आहे. न्यायाधीश आरिफ एस डॉक्टर यांच्या एकलपीठाने असे निरीक्षण नोंदवले. 








       काय  दिला न्यायालयाने निर्णय ? 


  फिर्यादी ने डीपफेक वर महर्षी ऋषी वाल्मिकी तयार केलेला व्हिडिओ वादग्रस्त असून, तयार केलेला व्हिडिओ चिंताजनक आहे. अश्या कंटेंटचा परिणाम सर्वात गंभीर असून, अशी व्हिडिओ तत्काळ पब्लिक डोमेन वरून सर्वांच्या हितासाठी काढून टाकली पाहिजे.

        " एआयचा वापर करून तयार केलेल्या " डीपफेक प्रतिमा आणि व्हिडियोचे वास्तववादी स्वरूप " खूप चिंताजनक असून, अशा बनावटी कृत्यांमुळे फक्त अभिनेता अक्षय कुमारचे व्यक्तिमत्व आणि नैतिक अधिकारांचे उल्लंघन होत नसून, सार्वजनिक सुव्यवस्था आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षितते संबंधी गंभीर धोका निर्माण झाला आहे," असे न्यायालय म्हणाले. 


           अक्षय कुमार यांनी दिली होती प्रतिक्रिया 

आताच मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व्दारे तयार केलेला व्हिडिओ बघितला आहे. ज्यात मी महर्षी वलमिकिंच्या भूमिकेत दिसत आहे. हे सर्व व्हिडिओ बनावट असून, वृत्तवाहिन्यांनी पडताळणी न करताच बातम्या लावल्या आहेत, असा दावा अभिनेते अक्षय कुमार ने केला होता. तर, माहितीची पडताळणी केल्या नंतरच ती बातमी प्रसारित करावी, असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले होते. 23 सप्टेंबर रोजी त्यांनी एक्स वर पोस्ट करत आवाहन केलं होतं.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या