भारत हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने पुढील ५ दिवसांचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केला आहे.
Monsoon Update :-
संपूर्ण विदर्भाला पुढील ५ दिवसांचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. ०४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर असा इशारा असणार आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती व पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ०४ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राच्या नागपूर विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांची नोंद हवामान विभागाने पिवळ्या झोन मध्ये केला आहे. तर, पूर्व विदर्भातील वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना धोका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने संपूर्ण विदर्भाला ०५ आणि ०६ सप्टेंबर रोजी धोका नसल्याचा अंदाज सांगितला आहे. या दिवशी हवामान विभागाने संपूर्ण विदर्भाचा समावेश हिरव्या झोन मध्ये केला आहे.
पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ०७ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दिवशी या जिल्ह्यांचा समावेश पिवळ्या झोन मध्ये करण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा धोका नसल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.
अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ८ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यांचा समावेश पिवळ्या झोन मध्ये करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा धोका नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
![]() |
IMD च्या नागपूर विभागाने एक्स वर हा फोटो पोस्ट केला आहे. |
0 टिप्पण्या