इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम ने केंद्र सरकारला केलेल्या शिफारसी वरून प्रश्न उपस्थित केला आहे.
Soureme Court Collegium Reommends SC Judge
पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल पंचोली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठीची शिफारस कॉलेजियम ने केंद्र सरकार कडे २५ ऑगस्ट रोजी केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील व सामाजिक कार्यकर्त्या इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम ने केलेल्या शिफारसी मध्ये एकही महिला न्यायाधिश का नाहीत आणि बुद्धिमत्ता फक्त पुरुषां पर्यंत मर्यादित असते का? असा सवाल त्यांनी कॉलेजियम पद्धतीला विचारला.
जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम निवडीवर टीका करत म्हणाले की, " न्यायाधीश विपुल पंचोली यांच्या पेक्षा न्यायाधीश सुनीता अग्रवाल, रेवती मोहिते डेरे आणि लीसा गिल हे तीन ज्येष्ठ महिला वकील आहेत. परंतु, त्यांना संधी दिलेली नाही. काय उच्च न्यायालयात एकही महिला प्रतिस्पर्धी न्यायाधिश नाही " असा सवालही त्यांनी केला. इंदिरा जयसिंह यांनी एक्स वर पोस्ट करत प्रश्न विचारला.
कोण आहेत इंदिरा जयसिंह?
जयसिंह यांचा जन्म मुंबई येथे झाला. इंदिरा जयसिंह यांनी महिलांच्या अत्याचाराशी संबंधित मेरी रॉय सारखा प्रकरण हाती घेऊन, केरळ राज्यातील सीरियन ख्रिश्चन महिलांना समान वारसा हक्क मिळवून दिला. जयसिंह यांनी गीता हरिहरन खटलाही यशस्वीपणे चालवला. तेव्हा इंदिरा जयसिंह यांनी केलेल्या युक्तिवादा मुळे " आई ही सुद्धा वडिलां प्रमाणे मुलाची नैसर्गिक पालक आहे " असा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने निर्णय दिला. युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन विरुद्ध नुकसान भरपाईच्या दाव्यात इंदिरा जयसिंग यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात भोपाळ दुर्घटनेतील पीडितांचे प्रतिनिधित्व केले.
0 टिप्पण्या