सुप्रीम कोर्ट कॉलेजियम :-
नवी दिल्ली :-
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पदासाठी सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियम ची बैठक झाली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून केंद्र सरकार कडे शिफारस करण्यात आली आहे. दोन नाव सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियम ने सुचविली आहे. न्यायाधीश आलोक अराधे आणि न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकार कडे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम मध्ये भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रम नाथ, जे.के. माहेश्वरी आणि बी.व्ही. नागरत्न यांचा समावेश आहे.
कोण आहेत दोन्ही न्यायाधीश ?
आलोक अराधे हे भारतीय न्यायाधीश आहेत. सध्या ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या पदावर कार्यरत आहेत. तेलंगणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कर्नाटक उच्च न्यायालय, जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कर्तव्य बजावले आहे. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश (Acting Chief Justice) पदी त्यांनी कर्नाटक उच्च नायालय आणि जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय येथे काम पाहिले आहे.
विपुल पंचोली हे भारतीय न्यायाधीश असून, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. सप्टेंबर १९९१ ला बार मध्ये उत्तीर्ण होऊन गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी वकीलीला सुरुवात केली. त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी काम केले आहे. त्यांची बदली पटना उच्च न्यायालय येथे करण्यात आली. तिथे न्यायाधीश पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांची नियुक्ती पटना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी करण्यात आली.
आता त्यांच्या सर्वोच्च न्यायाधीश पदाची शिफारस केंद्र सरकार कडे करण्यात आली आहे. केंद्र सरकार कॉलेजियम ने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी निवड केलेल्या दोन्ही न्यायाधिशांच्या बाबतीत काय निर्णय घेतात हे बघावं लागेल. विपुल पंचोली हे सुप्रीम कोर्टाचे पुढील सरन्यायाधीश (CJI) असेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या