Hot Posts

6/recent/ticker-posts

" उच्च न्यायालय कडून भीमा कोरेगाव एल्गार प्रकरणाचे आरोपी रमेश गायचोर यांना जामीन मंजूर " "तीन दिवसांसाठी न्यायालयाने दिला जामीन "

 


भिमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले रमेश गायचोर यांना मुंबई उच्च न्यालया कडून तात्पुरता दिलासा. 



भिमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरण :- 


भिमा कोरेगाव एल्गार परिषद २०१८ प्रकरणी अटक झालेले रमेश मुरलीधर गायचोर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने तीन दिवसांची जामीन मंजूर करण्यात आली आहे. न्यायाधीश ए एस गडकरी आणि न्यायाधिश राजेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. ७६ वर्षांचे वडील आजारी असल्याने  भेटीसाठी हा तात्पुरता दिलासा न्यायालयाने दिलेला आहे. 







बार अँड बेंच यांच्या वृत्तानुसार, " याचिकाकर्त्यांचे ७६ वर्षांचे वडील पुण्यातील येरवडा येथील ग्लोबल हॉस्पिटल २६ जून २०२५ ला भरती होते आणि २७ जून २०२५ ला त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही मागील ४ वर्षापासून त्यांना त्यांच्या वडिलांना भेटू दिले जात नव्हते. 

     

   मुरलीधर गायचोर 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान जामिनीवर असणार आहेत व मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांकडे २५,००० रुपये सुरक्षा म्हणून जमा करावे लागेल. इतर एस्कॉर्ट शुल्क कोर्टाने माफ केले आहेत. 

           याचिकाकर्त्यांचे वकील मिहिर देसाई यांनी युक्तिवाद केला की मानवी दृष्टिकोनातून वडिलांच्या भेटी संदर्भात केलेल्या विनंतीला खालच्या न्यायालयाने नाकारले असून, गेल्या चार वर्षांपासून याचिकाकर्त्याने त्याच्या वडिलांची भेट घेतलेली नाही. 

      


याआधी ते राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या एका विशेष न्यायालयात गेले तिथे त्यांना जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. मागील सुनावणी दरम्यान न्यायालया पुढे राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने दोन आठवड्याचा वेळ देण्याची मागणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी  केली होती. न्यायालयाने गायचोर यांना आता तीन दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे.


रमेश गाईचोर हे भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी अटक झालेल्या पैकी एक आरोपी आहेत. पुणे येथे भिमा कोरेगाव एल्गार परिषद 31 डिसेंबर २०१७ ला पार पडली होती. एल्गार परिषदेत सहभागी झाल्याचा आणि उपस्थित लोकांना भडकवल्याचा आरोप गायचोर यांच्यावर आहे. ते कबीर कला मंच चे सदस्य आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या