Hot Posts

6/recent/ticker-posts

" एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन गणेशोत्सव पूर्वी दिले जाणार" " परिवहन मंत्र्यांनी केली घोषणा "

 



MSRTC Staff  & Officers :-


मुंबई :- 

तुमच्या कुटुंबा पैकी कोणी जर एसटी कर्मचारी म्हणून कामाला असेल. तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या मार्ग परिवहन महामंडळाने राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यां प्रमाणे एस टी च्या जवळपास ८३ हजार कार्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना गणेशोत्सवा पूर्वी ऑगस्ट महिन्याचा वेतन दिले जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक्स वर दिली.








     " एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला ७ ते १० तारखे पर्यंत सरकार त्यांच्या खात्यात जमा करत असते. यंदा गणेशोत्सव महिन्याच्या शेवटी दाखल झाल्याने सणासुदीच्या ऐन वेळेस कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटीची प्रतिपूर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार शासनाने 25 ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढलेला असून, लवकरच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा वेतन जमा केला जाईल ",   असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 


" स्वतःच्या घरी सण उत्सव साजरे होत असताना तिथे उपस्थित न राहता, सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी मेहनत घेणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदाचा जावा" यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सदिच्छा दिल्या आहेत " 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या