मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मुंबई तील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षण :-
अंतरवली :-
अंतरवली येथून २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबई ला प्रस्थान करणार आहोत. शिवनेरी गड जुन्नर येथे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी मुक्काम करणार असून, २८ ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेणार आहोत. राजगुरू खेड मार्गे चाकण हून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशि, चेंबूर, या मार्गाने जाणार असून, सायंकाळी २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे आम्ही पोहचणार आहोत. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्या पासून आमचं आमरण उपोषण सुरू होणार आहे, अशी घोषणा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांनी केली आहे.
पुढे म्हणाले,
" मराठा आणि कुणबी एक असून, तसा अध्यादेश मंजुरी सकट पाहिजे अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नसून, हैद्राबादचे गॅझेट आम्हाला अंमलबजावणी सहित लागू करून पाहिजे. त्याच्यावर अभ्यास सुरू आहे अशी कुठलीही गाऱ्हाणे आम्ही ऐकूण घेणार नाहीत. सातारा संस्थान, बॉम्बे गझेटियर आणि औंध संस्थानांचे चे हजारो वर्षांचे गझेटियर लागू केली पाहिजे. समाजाचे सरकारी नोंदी कोणाकडे असेल, तर विरोध कोणीच करणार नाही आणि जर झालाच तर सरकारने त्याच्याबद्दल विचार करायला नाही पाहिजे. आमच्या हक्काचं आरक्षण सरकारने आम्हाला दिलं पाहिजे. सरकारने आडमुठे भूमिकेत न चालता विषय आधी समजून घ्यावा ".
" सगेसोयऱ्यांची अधिसूचना सरकारने काढली त्याची अंमबजावणी अद्यापही केलेली नसून, सरकारने मागे आम्हाला सांगितलं होतं की, २०१२ च्या कायद्यात दुरुस्ती केली आहे. अंमलबजावणी करिता ६ महिने वेळ द्या. हरकती मागवून त्याची छाननी करावी लागेल असं सरकार म्हणाले होते. आता त्या गोष्टीला दीड वर्ष झाले असून, इतका कोणताच समाज थांबू शकत नाही. इतका मराठा समाजाने वेळ घेतला आहे, "असेही मनोज जरांगे म्हणाले.
0 टिप्पण्या