" सर्वोच्च न्यायालयाचे प्रा. संजय कुमार प्रकरणी स्थगिती "

 



सर्वोच्च न्यायालय :- 

प्रा. संजय कुमार यांच्यावर निवडणूक आयोगाने   गुन्हा दाखल केल्या प्रकरणी  सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिली आहे.



News Source Live Law :-


नवी दिल्ली :- 


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निवडणुकीचे चुकीच्या पद्धतीने विश्लेषण समाज माध्यमांवर केल्याने प्रा. संजय कुमार यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत दिलासा दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय सरन्यायाधीश भूषण आर. गवई आणि न्यायाधीश एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. प्रा. संजय कुमार यांनी न्यायालयाला FIR रद्द करण्याची मागणी रिट याचिके व्दारे केली होती. 

  





       संजय कुमार पेशाने मानसशास्त्रज्ञ असून, भारतीय राजकिय विश्लेषक आहेत. विकसनशील समाजांच्या अभ्यासासाठी केंद्र (CDSS) चे माजी संचालक यांनी काही दिवसांपूर्वी एक्स वर वाढीव मतदार आणि कमी झालेल्या मतदार संबंधी काही विशिष्ट मतदारसंघा विषयी विश्लेषणात्मक पोस्ट केली होती. 2024 च्या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांना ही पोस्ट चुकीच्या विश्लेषणावर आधारित असल्याचे जाणवले. घोडचूक झाल्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणात एक्स वर माफी मागितली होती. 

           निवडणूक आयोगाने प्रा. संजय कुमार यांच्या वर नाशिक आणि नागपूर येथे दोन्ही ठिकाणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत १७५, ३५३ (१) (ब), २१२, ३४०(१) (२), ३५६ गुन्हे दाखल केले होते. निवडणूक आयोगाने प्रा. संजय कुमार यांच्यावर गुन्हे दाखल केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली असून, निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या गुन्ह्याला "राज्य सत्तेचा गैरवापर" असल्याचा युक्तिवाद कुमार यांनी केला. 

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या