Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोपी वकील राकेश किशोर विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाईला सुरुवात करण्यास देशाच्या महान्यायवादींची परवानगी "



सर्वोच्च न्यायलयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी राकेश किशोर यांच्यावर न्यायालयाचा अवमान कायद्या अंतर्गत कारवाईला सुरुवात करण्यास  भारताचे महान्यायवादी आर. वेंकटरमणी यांची परवानगी मंजूर. 




 

AGI Allowed to Contempt Of Court Against The Accused Rakesh Kishor


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी वकील राकेश किशोर विरोधात न्यायालयाचा अवमान कायद्या अंतर्गत कारवाईला सुरुवात करण्याची परवानगी भारताचे महान्यायवादी (Attorney General Of India)  आर. वेंकटरमणी यांनी दिली. 



         




सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील विकास सिंह यांनी आजच पत्राद्वारे भारताचे महान्यायवादी ( Attorney General Of India) यांना मागणी केली. देशाचे महान्यायवादी यांनी आजच मंजूर करत कारवाईला सुरुवात करण्याची परवानगी दिली. न्यायालयाचा अवमान कायदा १९७१ अंतर्गत कारवाईला सुरुवात करण्याची परवानगी दिली. 


   महान्यायवादी आर. वेंकटरमणी यांची प्रतिक्रिया 


कोणत्याही व्यक्तीकडे न्यायालयाला कलंकित करण्याचे कोणतेही कारण असू शकत नाही. न्यायाधिशांना लक्ष्य करून कोणतीही वस्तू फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे किंवा न्यायाधीशांवर ओरडून कारवाईच्या वर्तनात दोष शोधणे हे निंदनीय ठरते. आरोपी राकेश किशोर यांनी दिलेल्या स्पष्टीकरण चे आणि वर्तनाचे समर्थन करू शकत नाही. अशी कृत्ये न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि कायद्याच्या राज्यालाच धोका पोहचवत असतात.



              काय आहे प्रकरण ? 


आरोपी वकील राकेश किशोर यांनी ६ ऑक्टोबर ला सकाळी न्यायालयात सूनवाई दरम्यान मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ आरोपीला पकडून न्यायालयाच्या बाहेर नेत असताना आरोपीने "सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान" या प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यामुळे न्यायालयातील सर्वांचाच गोंधळ उडाला. सरन्यायाधीश गवई यांनी याप्रसंगी सर्वानाच कामाला सुरुवात करण्याचे आवाहन केले आणि अश्या प्रसंगामुळे माझ्यावर काही परिणाम होत नसतो, असेही मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्पष्ट केले होते. 


    

 



      आरोपी वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया 


आरोपी वकील राकेश किशोर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हणाले होते की, " मी जे कृत्य केलं त्यामागे दैव शक्ती होती, त्यामुळे मला रात्री झोप लागत नव्हती. सरन्यायाधीश यांनी क्रिया केली आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रकरण घडलं तेव्हा मी नशेत नव्हतो आणि मला या गोष्टीचा पश्र्चाताप अजिबात नाही."


       काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर आरोपीवर कारवाई न केल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणावर अनेक राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिली होती. " सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा केलेला अपमान पूर्णपणे निषेधार्ह आहे. वकिलाची अशी विचारसरणी असेल तर, तो संविधानाचा अपमान आहे" असे काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते. 

   तर, "जातीवर आधारित अत्याचार गावा पर्यंतच मर्यादित असतात आणि जाती व्यवस्थेला मोकळीक आणि हिंसक पद्धतीने लागू केली जायची. शहरात हाच जातीवाद चार भिंती आड दडलेला असतो," अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या