Hot Posts

6/recent/ticker-posts

" गोविंद पानसरे हत्याकांड च्या आरोपींना बॉम्बे उच्च न्यायालयाच्या वतीने जामीन मंजूर "

 


बॉम्बे उच्च न्यायालयाने कॉम. गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी सुद्धा नऊ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 




Bombay High Court Allows to Grant Bail To Accuse Of The Com. Govind Pansare :- 


मुंबई उच्च न्यायालय च्या कोल्हापूर खंडपीठाने दिवंगत कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्ये प्रकरणातील तीन आरोपींना जामीन मंजुर केला आहे. वीरेंद्र तावडे, शरद कालस्कर आणि अमोल काळे  असे आरोपींचे नाव आहे. न्यायाधीश शिवकुमार दिगे यांनी जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या एकलपिठाकडून हा निर्णय देण्यात आला.



Photo Source The Economic Times.



कॉम. गोविंद पानसरे यांच्या हत्येला १० वर्ष पूर्ण झाली असून, १६ फेब्रुवारी 2015 ला कॉम. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी ची हत्या करण्यात आली होती. पहाटे फिरून वापस येत असताना कोल्हापूर मधील त्यांच्या घरा जवळच त्यांच्यावर दोन व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. या हत्याकांडामुळे देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली होती.

दिव्य मराठी च्या वृत्तानुसार, आरोपी विरेंद्र सिंह हा हिंदू जनजागृतीचा सदस्य आहे. तर, अमोल काळे आरोपीला कर्नाटक पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केली होती. सर्व आरोपींना २०१८ साली अटक करण्यात आली होती.
वीरेंद्र तावडे हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून,  त्याने हत्येचा कट रचला. शरद कालस्कर, अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे युवकांची माथी भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


या प्रकरणातील तपास सुरुवातीला राजारामपुरी पुलिस स्टेशन कोल्हापुर व्दारे केला गेला. त्यानंतर CID तर्फे या प्रकरणी तपास करण्यात आला. या प्रकरणात १२ आरोपींना अटक करण्यात आली व दोन आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर फरार घोषित केले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या