Hot Posts

6/recent/ticker-posts

" दिवाळी पूर्वी जर नुकसान भरपाई दिली नाही तर सर्वच ..... प्रकाश आंबेडकर गरजले "

 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र शासनाला अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करिता गंभीर इशारा दिला आहे. मागण्या मंजूर न झाल्यास शेतकऱ्यांसोबत काळी दिवाळी साजरी करू असेही आंबेडकर म्हणाले.




Prakash Ambedkar Warns  To CM Devendra Fadnavis :- 




राज्यातील काही भागात काही दिवसांपूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने गाव आणि शेती पाण्याखाली गेली होती. याप्रसंगी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा ही मागणी जोर धरू लागली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याची मागणी केली असून, मागण्या मंजूर न झाल्यास राज्यभरातील सर्वच सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन "काळी दिवाळी" साजरी करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिला. 

          

Photo Source Dainik Jaagran Media Company.




       काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?


शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची असंवेदनशील वृत्ती दिसून येत आहे. निवडणुकी पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू याप्रकारचे आश्वासन देत सध्याचे शासन सत्तेवर आलेत. मात्र, शासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता वेळ काढू भूमिका घेत असून, शेतकऱ्यांचा बळी शासनाला घ्यायचा आहे अशी टीका करीत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या अशी मागणी आम्ही वारंवार शासना पुढे केली, असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला. 

         

       

         

                  काय आहेत मागण्या? 


शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावी. ऊस दर आधीच ठरवावा. कापसाला हमीभाव मिळावा. शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने करावी. शेतीमालाला हमीभाव द्यावे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान सोडवण्या कडे गांभीर्याने बघावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या