दरवर्षी चंद्रपूर जिल्हाधिकारी तर्फे धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त जाहीर करण्यात येणारी सुट्टी यंदा जाहीर न केल्याने बौद्ध धर्मियां मध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. यावरून बंडू नगराळे यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे.
Bandu Nagrale Criticises Chandrapur District Collector :-
![]() |
| Photo Source Bandu Nagrale FaceBook Account |
दरवर्षी दीक्षाभूमी चंद्रपूर येथील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्या निमित्त जिल्हाधिकारी सुट्टी जाहीर करत असतात. परंतु, यंदा सुट्टी जाहीर न केल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, "मुंह में राम बगल में छुरी" असा हा प्रकार आहे. अशी टीका सामाजिक कार्यकर्ते बंडू नगराळे यांनी केली. यासोबतच १६ ऑक्टोबर पूर्वी जर सुट्टीची जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली नाही. तर, जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध नोंदवू, अशी घोषणा बंडू नगराळे यांनी केली.
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना ३ सुट्ट्या देण्याचा अधिकार असतो. परंतु, वटसावित्री, तान्हा पोळा आणि नरक चतुर्दशी या हिंदू धर्मियांच्या सणा निमित्त तिन्ही सुट्ट्या आधीच जिल्हाधिकारी यांनी घोषित केल्या आहेत. दरवर्षी बौध्द धर्मियांच्या सणा निमीत्त जाहीर करण्यात येणारी सुट्टी हिंदू धर्मियांच्या सणासुदीला जाहीर केली. परंतु, बौध्द धर्मियांच्या सणा करिता सुट्टी राखीव ठेवलेली नाही. त्यामुळे बौद्ध धर्मियांवर हा अन्याय आहे, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते बंडू नगराळे यांनी केली.
दीक्षाभूमी वरील मंचावरून जर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आणि राजकीय पक्षांनी त्यांचा प्रचार केला. तर, त्यांचा निषेध केला जाईल, असा इशारा बंडू नगराळे यांनी दिला.


0 टिप्पण्या