Hot Posts

6/recent/ticker-posts

" आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणे शक्य नाही, मंत्री रामदास आठवले "

 


केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि राज्यसभा खासदार रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन ऐक्य करण्यास सोबत येण्याचे आवाहन केले आहे. 




Minister Ramdas Athawale appeal to Prakash Ambedkar :- 


रिपब्लिकन ऐक्या प्रकरणी सतत वक्तव्य करणारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी परत वक्तव्य केलेलं आहे. या वक्तव्या दरम्यान त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना परत एकत्रित येण्याबद्दल आवाहन केलेलं आहे. आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणे शक्य नसल्याचे म्हणत रिपब्लिकन ऐक्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.

             प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितले.





ज्याप्रमाणे राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत आहेत, तश्याच भेटीगाठी माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या वाढल्या पाहिजेत, असे वक्तव्य मंत्री आठवलेंनी केले आहे. राज्यात काही ठिकाणी मनसे आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढणार असून, त्याचा महायुती वर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला आहे.


याच प्रकारचे महाबोधी महाविहार, आंबेडकरी एकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रित येण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांना मंत्री रामदास आठवले यांनी एक्स वर सुद्धा पोस्ट करत केले आहे.

मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमां मध्ये येऊन अनेकदा प्रकाश आंबेडकर यांना सोबत येण्याचे आवाहन केले. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी या आवाहनाला अजून पर्यंत तसा प्रतिसाद दिलेला नाही.




       


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या