Hot Posts

6/recent/ticker-posts

"खासदार संदीपान भुमरे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्या वरून अंबादास दानवेंची बोचरी टीका"


शिवसेनेचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स पोस्ट वरून छत्रपती संभाजी नगर चे खासदार संदिपान भुमरे यांच्या वर बोचरी टीका केली असून, भुमरेंना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याने सदिच्छा सुद्धा दिल्या आहेत. 


 

Ambadas Danve Crticises MP Sandipan Bhumre :- 



छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चे खासदार संदीपान भुमरेंना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्या वरून राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. त्यावर शिवसेना ऊबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मिश्किल पणे टिप्पणी केली असून, खासदार संदिपान भुमरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.






खासदार संदीपान भूमरे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने ऊबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन केला आहे. त्यानंतर त्यांनी बोचरी टीका केली आहे. 

      छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा उल्लेख छत्रपती संभाजी नगर चे शशी थरूर असा करत त्यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न, पाणी, महिला, कामगार, रस्ते आणि आरोग्या संबंधीत प्रश्न संसदेत मांडून त्यांच्या मतदासंघांला न्याय दिला असा टोला हाणला असून, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे त्यांच्या ज्ञानाच्या आवाक्या बाहेरचा विषय नाही, असे सुद्धा भुमरेना सुचवित चिमटा काढला आहे.

     खासदार संदीपान भुमरेना संसदरत्न पुरस्कारची नेमकी घोषणा कोणी केली? असा प्रश्नही अंबादास दानवेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांची एक्स पोस्ट चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या