Hot Posts

6/recent/ticker-posts

" सुवर्ण मंदिर मिळवण्याची पद्धत चुकीची होती " " पि चिदंबरम यांचा मोठा आरोप "

 



काँग्रेसचे वरिष्ठ नेते पि. चिदंबरम यांनी माजी पंतप्रधान दिवं. इंदिरा गांधी यांनी केलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात मोठा आरोप केला आहे. या आरोपामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. यावर आता काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



 M.P. Chidambaram Criticised EX-PM Indira Gandhi :- 


काँग्रेसचे नेते पि. चिदंबरम यांच्या वक्तव्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्या वक्तव्याने नव्या नवा वाद पेटण्याची शक्यता असून, चिदंबरम यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. " सुवर्ण मंदिर पुनः मिळवण्यासाठी सुरू केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टार ची पद्धत चुकीची होती आणि त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना त्याची किंमत जीव देऊन मोजावी लागली" असा आरोप काँग्रेस चे नेते व माजी केंद्रीय वित्त मंत्री पि. चिदंबरम यांनी केला आहे."






Photo Source The Alternate Media Twitter Account

 





खुशवंत सिंह साहित्य महोत्सव येथील पत्रकार आणि लेखक हरिंदर बावेजा यांच्या "दे विल शूट यू मॅडम: माय लाईफ थ्रू कॉन्फ्लिक्ट" या पुस्तकाच्या परिसंवाद दरम्यान पि. चिदंबरम यांनी भाष्य केले.



पुढे म्हणाले, " ऑपरेशन ब्ल्यू स्टार दरम्यान केलेल्या फक्त माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचीच चुकी नसून, तत्कालीन मिलिटरी अधिकारी, पोलीस अधिकारी, प्रशासन आणि गुप्तचर विभाग यांचा तो निर्णय होता."



             काँग्रेसचे रशीद अल्वी यांची प्रतिक्रिया 


काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, " पि. चिदंबरम यांच्यावर असा कुठला प्रसंग ओढवला आहे, ज्यामुळे ते पक्षावर आसूड ओढून राहिले आहेत. पंतप्रधान जसं काम करतात, तसंच काम आता पि. चिदंबरम करत आहेत. भाजप ज्याप्रकारे देशाला बर्बाद करतोय त्यावर बोलण्यापेक्षा काँग्रेसवर हल्ला करत आहेत हे योग्य नाही. " 


                पि. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्याने काँग्रेस मध्ये खळबळ उडाली असून, काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे वृत्त आहे. आता काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व या प्रकरणात काय भूमिका घेतात ते पाहण्यासारखे आहे. 

      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या