Priyank Kharge Writes Letter To CM Siddaramaiah :-
कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनेवर आरोप करत, मोठी मागणी केली आहे. कर्नाटक मधील मुले, तरुण पिढी आणि समाज हिता करिता सरकारी ठिकाणी आणि मैदाने, उद्याने, मुजराई विभागाची मंदिर येथे आरएसएस संघटनेने चालवलेल्या शाखा किंवा 'बैठक' अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्राद्वारे केली आहे.
सरकारी ठिकाणी आणि सरकारी अनुदानित शाळा व सार्वजनिक सरकारी मैदानाचा वापर करून, संघा तर्फे शाखा चालवल्या जातात. मुलांना आणि तरुण पिढीच्या मनात देशाच्या एकात्मतेच्या विरोधात आणि संविधानाच्या विरोधात नकारात्मक विचार रुजवले जात आहेत, असा आरोप प्रियंक खरगे यांनी केला.
सध्या समाजात विभाजन करणारी प्रवृत्ती वाढत चाललेली असून, त्यांना नियंत्रणात आणण्या करिता देशाच्या धर्मनिरपेक्ष मुल्यांचे रक्षण करण्यासाठी संविधान अश्या शक्तींना दडपण्यासाठी अधिकार देते, असा सल्ला त्यांनी एक्स अकाउंट वर पोस्ट केलेल्या पत्रात दिला आहे.
भाजपचे किती नेते गौरक्षक आहेत? भाजपच्या किती नेत्यांच्या मुलांनी त्रिशूल दीक्षा घेतली आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्व फक्त गरीब लोकांसाठी आहे अशी टीका मंत्री प्रीयांक खर्गे यांनी ANI वृत्त एजन्सी सोबत बोलताना केली.

0 टिप्पण्या