अभिनेत्री दीपिका पादुकोण हीची निवड केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राजदूत (Ambassador) पदी केली आहे. मानसिक आरोग्य बद्दल समाजात जागरूकता पसरविण्यासाठी तिची निवड करण्यात आली आहे.
Actress Deepika Padukone Appointed Mental Health Ambassador :-
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तिच्या छपाक चित्रपटा पासून ती कायमच चर्चेत राहिली आहे. अशातच आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तिची निवड मानसिक आरोग्य राजदूत (Ambassador) पदी केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने निवड झालेली ती पहिली व्यक्ती ठरली आहे.
![]() |
| Photo Source FilmyDrama Face Book Post |
समाजात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हीची नियुक्ती झाल्याचे स्वतः आरोग्य मंत्रालयाच्या एक्स अकाउंट वरून जाहीर करण्यात आले आहे.
![]() |
| Photo Source From Ministry Of Health X Account |
अभिनेत्री सुपरस्टार दीपिका पादुकोन यांच्या सोबतची ही भागीदारी देशभरात मानसिक आरोग्याशी संबंधित जागरूकता वाढवण्यासाठी, कलंक कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे आरोग्य मंत्रालया तर्फे स्पष्ट करण्यात आले.
काय म्हणाली दिपिका पादुकोण ?
" केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पहिल्या मानसिक आरोग्य राजदूत (Ambassador) म्हणून सेवा करण्यास खूप सन्मानित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारताने मानसिक आरोग्य सेवांना प्राधान्य देण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. मला या गतीवर आधारित काम करण्यास आणि आपल्या राष्ट्राच्या मानसिक आरोग्य संरचनेला आणखी मजबूत करण्यास मंत्रालय सोबत जवळून काम करण्यास तयार आहे."
अभिनेत्री दीपिका पादुकोन ही सिनेसृष्टीत काम करतेच. परंतु, "लिव्ह लव्ह लॉफ" नावाची संस्था देखील तिने दहा वर्षापूर्वी स्थापन केली. तिच्या या संस्थेला १० वर्ष पूर्ण झाले असून, तिच्या संस्थेचे उद्देश " तणाव, चिंता आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशा देणे आहे."
"मानसिक आजारामुळे कोणताही जीव जाऊ नये", असे संस्थेचे संस्थापक दीपिका पदुकोण यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचं म्हणजे ती स्वतः डिप्रेशन (मानसिक ताण) मधून बाहेर पडली आहे. केंद्र शासनाच्या या निर्णय विरोधात समाज माध्यमांवर नेटकरी टीकेची झोड उठवत आहेत.



0 टिप्पण्या