शिवसेना ऊबाठा गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सामील होण्यासाठी पत्र लिहिले आहे.
MP Sanjay Raut wrote Letter To CM Devendra Fadnavis :-
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका घ्या असा आदेश दिला होता. त्यानुसार आता काही दिवसांतच निवडणुका जाहीर केल्या जातील. अशातच शिवसेना ऊबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळात सामील होण्यासाठी पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणविस यांना होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रक्रिया आणि यंत्रणेवर कोणताही संशय नसला पाहिजे, यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलींगम यांची शिष्टमंडळ भेट घेणार असून, शिष्टमंडळात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे शिष्टमंडळ १४ ऑक्टोंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहे.
कोण कोण राहणार उपस्थित?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे राज्य प्रमुख हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह इतर पक्षाचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
होणाऱ्या निवडणुकीत कुठल्याच प्रकारची शंका राहू नये व होणारी निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होऊन, लोकशाही बळकट व्हावी, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.


0 टिप्पण्या