Hot Posts

6/recent/ticker-posts

"कोकण वासियांना एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे द्या" शरद पवारांचे



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोकणवासीयांना रेल्वे स्थानक वर एक्स्प्रेसला थांबा देण्याच्या मागणीसाठी राज्यसभा खासदार शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. 





राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोकणवासीयांसाठी एक विशेष मागणी केली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानक वर ३२ एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे. 




Photo Source Swarajya Media Company.





 सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. निसर्गरम्य किनारे, ऐतिहासिक किल्ले आणि समृद्ध वारसा यामुळे कोकणाला ओळखले जाते. परंतु, अनेक वर्षापासून कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी या भागात एक्स्प्रेस गाड्या थांबत नसल्याने या भागातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.

 गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यां सारख्या गर्दीच्या  हंगामात प्रायोगिक तत्त्वावर ते सुरू केले जाऊ शकतात, असा सल्ला शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या