" नवी मुंबई पोलिसांनी सरन्यायाधिश यांच्या बद्दल आक्षेपार्ह विडिओ पोस्ट केल्या प्रकरणी केला गुन्हा दाखल "

 


सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अवमान प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ॲड. अमित कटारनवरे यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल केला आहे.




FIR Lodged against Kikki Singh for insulting the Chief Justice :- 


सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र चर्चा सुरु आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने देशात खळबळ उडाली आहे. अनेक जण या हल्ल्याविरोधत निषेध नोंदवत आहेत. तर, अनेक असामाजिक तत्व या घटनेचे समर्थन करत आहेत. अशातच नवी मुंबई पोलिसांनी देशाचे सरन्यायाधीश गवई यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने आरोपी आणि तिच्या साथीदारांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (२०२३) आणि अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 







     ॲड. अमित कटारनवरे यांनी आरोपी विरोधात नवा (New) पनवेल पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. आरोपीचे नाव किक्की सिंह असून, एक्स अकाउंट वर देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधात जाती वरून आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सदर व्हिडिओ AI व्दारे तयार केला गेला. ज्यामध्ये सरन्यायाधिशांचा चेहरा निळ्या रंगा मध्ये दाखवल्या जात आहे. त्यांच्या गळ्या मध्ये मडके ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपीने पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती जोड्याने हल्ला करताना दिसत आहे. 

      तक्रारदार ॲड. अमित कटारनवरे यांचे असे म्हणणे आहे की, व्हायरल व्हिडिओ मधून आरोपीला असे दाखवून द्यायचे आहे की, " अनुसूचित जातीतील एखाद्या व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर जाऊन बसले तरी, इतिहासात ज्या प्रकारे अस्पृश्यांना वागवले गेले होते. त्याच प्रमाणे आता सुद्धा जातीच्या आधारे वागवले गेले पाहिजे."



        

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या