सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार जर माझ्यावर कारवाई करणार नसेल तर मी आरोपी वकील वर गोळ्या घालायला तयार आहे, असे माजी मंत्री सुबोध सावजी म्हणाले.
Ex-Minister Subodh Saoji Demands To Lay The Shell On Accused Rakesh Kishor:-
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा बातम्या समाज माध्यमां वर व्हायरल होत आहेत. काही विरोधात प्रतिक्रिया नोंदवत आहेत. तर, काही समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदवत आहेत. आरोपी वकील राकेश किशोर यांच्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच माजी मंत्री सुबोध सावजी यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट आरोपी वकिल वर गोळ्या झाडण्याची मागणी केली असून, खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे
![]() |
| Photo Source India TV News |
काय म्हणाले माजी मंत्री सुबोध सावजी ?
महाराष्ट्र राज्याच्या विधान मंडळा मध्ये सरन्यायाधिश भूषण गवई यांचे वडील रामकृष्ण गवई आणि मी एकत्र विधान मंडळात काम केलं त्यावेळेस मी राज्यमंत्री होतो. आज देशात जो काही प्रकार घडत आहे. विशेषतः सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वरील हल्ला ज्या माथेफिरूने केला. प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात आरोपी वकीलवर काहीच कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली. असा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
पुढे म्हणाले, " आरोपी वकील वर मला गोळ्या घालायच्या आहेत. फक्त पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि कायदा मंत्री यांनी माझ्याविरोधात कुठलीही कारवाई करू नये. तर, मी गोळी घालण्यास तयार आहे."

0 टिप्पण्या