राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी वकील यांची भेट घेतली आहे. आरोपीचे कृत्य संविधानाच्या विरोधात असल्याचे त्यांनी या भेटीत सांगितले आहे.
MP Nilesh Lanke Meets Accused Adv. Rakesh Kishor :-
सध्या देशाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या वर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली असून, समाज माध्यमांवर राजकीय आणि सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यावर तीव्र प्रतिक्रिया उमटवत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुनवाई दरम्यान जोडे फेकून मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी वकील राकेश किशोर यांची भेट घेतली आहे.
![]() |
| Photo Source Loksatta Live X Account |
आरोपी वकील राकेश किशोर यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतली. या भेटीत त्यांनी आरोपी वकील यांना संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान दिले. भेटीचे कारण त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले.
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी सरन्यायाधीश यांची असते, परंतु, सरन्यायाधीश गवई यांच्यावर ज्या प्रकारे जोडे फेकून मारण्याचे प्रयत्न आरोपी वकील राकेश किशोर यांनी केला. त्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी मी संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांना भेट म्हणून दिली.
आरोपी वकील राकेश किशोर यांनी आम्हाला संविधान मान्य नसल्याचे सांगितले. हा देश जात आणि धर्मा वर चालतो असे राकेश किशोर म्हणाले असून, मोठा गौप्यस्फोट खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.
आरोपी वकील राकेश किशोर यांच्यावर नुकतेच बंगरुळू पोलीस ठाण्यात एका वकिल तर्फे भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 टिप्पण्या