Hot Posts

6/recent/ticker-posts

" सरन्यायाधीशां वर जोडे फेकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी वकील राकेश किशोर यांच्या विरोधात बंगळुरू येथे गुन्हा दाखल "

 


सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वर जोडे फेकून मारल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी वकील राकेश किशोर यांच्या विरोधात बंगरुळू पोलीस ठाण्यातून वकील तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Lodged FIR Against Accused Advocate Rakesh Kishor :- 


देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जोडे फेकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी वकील राकेश किशोरच्या विरोधात बंगळुरू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  न्याय पालिकेची प्रतिमा मलिन होण्यापासून वाचवण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे वकील भक्तवचला यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून विधान सौधा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायद्या अंतर्गत कलम १३२ आणि कलम १३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे."


बार अँड बेंच च्या वृत्ता नुसार,    FIR दिल्लीतील संबंधित पोलिस ठाण्यात  हस्तांतरित केला जाणार असून, जिथे हा गुन्हा झाला त्यांच्या अधिकार क्षेत्रात सुपूर्द केला जाणार आहे.







               कोण आहेत राकेश किशोर ? 

आरोपी वकील हे ७१ वर्षाचे असून, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन चे सदस्य होते. यासह ते शाहदरा बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ दिल्ली चे ही सदस्य होते. दिल्लीच्या मयूर विहार एरिया मध्ये ते वास्तव्यास आहेत इंडिया टुडे ने माहिती दिली. बार कौन्सिल ऑफ दिल्ली मध्ये 2009 ला त्यांनी नोंदणी केली होती. 


     नेमकं काय घडलं सर्वोच्च न्यायालय मध्ये? 


सर्वोच्च न्यायालय मध्ये सुनावणी दरम्यान आरोपी वकील राकेश किशोर ने जोडे फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यानच सुरक्षा रक्षकांनी धरून बाहेर नेत असताना आरोपीने " सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान " अश्या प्रकारच्या वल्गना दिल्या. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. काही वेळ त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीश गवई यांच्या निर्देशां वरून त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना सोडण्यात आले. 


                    नशेत कृत्य केलेलं नाही


सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आदेशानंतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. त्यामध्ये उत्तर देताना ते म्हणाले की, " सरन्यायाधीश गवई यांनी सनातन धर्माचा अपमान केला त्यामुळे दैव शक्ती मला झोपू देत नव्हती. सरन्यायाधीश यांनी क्रिया केली आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रकरण घडलं तेव्हा मी पूर्णपणे शुद्धीवर होतो आणि मला त्या गोष्टीचा अजिबात पश्र्चाताप नसून, मी माफी सुद्धा नाही मागणार आहे."


       यानंतर समाज माध्यमां वर आरोपीवर कारवाई न केल्याने तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. आरोपी वर कुठलीही कारवाई न केल्याने AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी चांगलाच समाचार घेतला. तर, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वर हल्ला करणारी दैव शक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याचा दावा केला आहे.


            


   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या