Hot Posts

6/recent/ticker-posts

" आरोपी वकील राकेश किशोर विरोधात गुन्हेगारी अवमान अंतर्गत कारवाई करा " " सर्वोच्च न्यायालयाचे वकील चे महान्यायवादी यांना पत्र "

 

महान्याय वादी (Attorney General Of India)  यांच्या समोर सरन्यायाधीश गवई यांच्यावर जोडे फेकून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी राकेश किशोर यांच्यावर गुन्हेगारी अवमान अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वकीलाने पत्र लिहिले आहे.



Petitition Filed Against Accused Advocate Raksesh Kishor :- 

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यावरील हल्ल्याच्या बातम्या समाज माध्यमां वर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे समाज माध्यमां वर आरोपीला मोकाट सोडल्या वरून संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच आज आरोपी राकेश किशोर यांच्यावर गुन्हेगारी अवमान अंतर्गत कारवाई करण्या संदर्भात देशाचे महान्यायवादी (Attorney General Of India) यांना सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सुभाषचंद्रन के.आर. यांनी पत्र लिहिले आहे.

             




          काय लिहिले आहे पत्रात ? 


लाइव्ह लॉ वृत्त्ता नुसार, वकील सुभाष चंद्रन के.आर. यांनी अटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांना न्यायालयाचा अवमान कायदा, १९७१ च्या कलम १५ अंतर्गत संमती देण्याची विनंती केली आहे. आरोपी वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेकणे आणि सरन्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजी करणे हे न्याय प्रशासनात हस्तक्षेप करते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते, असे पत्रात उल्लेख केला आहे. 


                 काय आहे प्रकरण ? 


दोन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश गवई यांच्या वर जोडे फेकून मारण्याचा सुनावणी दरम्यान प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी सुरक्षारक्षकांनी तत्काळ त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा रक्षक बाहेर घेऊन जात असताना आरोपी राकेश किशोरने " सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान " अश्या घोषणा दिल्या. त्यानंतर हे प्रकरण समाज माध्यमां वर चांगलेच व्हायरल झाले. या हल्ल्याचा निषेध म्हणून अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी यावर तीव्र स्वरूपाचे प्रतिक्रिया नोंदवल्या. 


        काय होती आरोपी वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया ? 


आरोपी वकील राकेश किशोर यांच्यावर गुन्हे दाखल न करण्याचे निर्देश सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. त्या मुलाखत मध्ये ते म्हणाले की, " मी जे केलं त्यामागे दैव शक्ती होती, ज्यामुळे मला रात्री झोप लागत नव्हती. सरन्यायाधीश यांनी क्रिया केली आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रकरण घडलं तेव्हा मी नशेत नव्हतो आणि मला पश्र्चाताप नसून, मी माफी सुद्धा मागणार नाही आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या