Hot Posts

6/recent/ticker-posts

" महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असामाजिक तत्त्वांव्दारे अपमान " " प्रकाश आंबेडकरांचा आरोप "



वर्ध्यातील  महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील  विधी विभागातील विद्यार्थ्यानी संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंट वरून केला आहे. 




 

Prakash Ambedkar Big Allegations :- 

वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ विधी विभाग (Law Department) येथे काही असामाजिक तत्त्वां व्दारे संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केला, असा मोठा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 



Photo Source itl.cat Company


    प्रकाश आंबेडकरांचा आरोप काय ? 

विधी विभागातील काही विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा भेट म्हणून देण्यास गेले असता, काही असामाजिक तत्वांनी विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांनी फक्त विरोध केला नसून, त्यावेळेस आपत्तीजनक प्रतिक्रिया नोंदवल्या. यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अमर मणी तिवारी, ओम तिवारी, कुमार संभव, अभय मिश्रा, अतुल तिवारी आणि भारत परिहार मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. 


            वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटन सम्यक विद्यार्थी आंदोलन ने हा प्रश्न उचलून धरला असून, ही बाब गंभीर आहे. विद्यापीठाने या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

 



       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या