राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त लोकांसाठी मदत जाहीर केली आहे. दिवाळी पूर्वी ही मदत पीडितांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis A Relief Package For The Affected People :-
महाराष्ट्रात काही दिवसा पूर्वी सतत झालेल्या अतीवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी, ग्रामीण व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला होता. शासन पूरग्रस्तांसाठी किंवा नुकसानग्रस्तां साठी मदत का जाहीर करत नाही यावरून विरोधक शासनावर टीकेची झोड उठवत होते. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.
![]() |
| Photo Source DGIPR Official Twitter Account |
नेमकी किती मदत केली जाहीर ?
महाराष्ट्र शासनाने ३१,६२८ कोटी रुपयांचे एकूण पॅकेज जाहीर केले आहे. जाहीर केलेले पॅकेज खालील प्रमाणे माहिती देण्यात येत आहे :-
- खरडून गेलेल्या जमिनी करिता ४७,००० रोख आणि मनरेगा योजने अंतर्गत तीन लाख रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली आहे.
- पूरसदृश्य परिस्थिती असताना ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत. तर, जखमींना ७४ हजार ते अडीच लाख पर्यंत मदत करण्यात येणार आहे.
- घरगुती भांडी, कपडे आणि वस्तूंच्या नुकसान करिता ५००० रुपये प्रति कुटुंब इतकी मदत करण्यात येणार आहे.
- नुकसानग्रस्त दुकानदार आणि टपरी धारकांना ५०,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात येणार आहे.
- डोंगरी भागात पडझड आणि नष्ट झालेल्या पक्क्या घरांसाठी १,२०,००० रुपये व नष्ट झालेल्या कच्च्या घरांना १,३०,००० रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी ६,५०० रुपये. तर, झोपड्यांना ८,००० रुपये आणि जनावरांच्या गोठ्यांसाठी तीन हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- दुधाळ जनावरांसाठी ३७,५०० रुपयांची मदत अर्थसहाय्य म्हणून केली जाणार आहे. ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी ३२,००० रुपयांची. तर, कुक्कुटपालन करणाऱ्यांना १०० रुपये प्रति कोंबडी इतकी मदत केली जाणार आहे.
- खचलेल्या किंवा बाधित विहिरीसाठी ३०,००० रुपये प्रति विहीर इतके अर्थसहाय्य मदत म्हणून दिली जाणार आहे.
याशिवाय दुष्काळी सवलती लागू राहणार असून, जमीन महसूल मध्ये सूट देण्यात येणार आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता व शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे इत्यादींचा सुद्धा समावेश आहे.
सतत झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून, यामुळे राज्यातील २९ जिल्हे प्रभावित झाले आहेत. प्रभावित झालेल्या २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुके आणि २०५९ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची, घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केली आहे.
३१,६२८ कोटींच्या पॅकेज मध्ये कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये व हंगामी बागायती करीता २७ हजार रुपये, तर बागायती करिता प्रति हेक्टरी ३२ हजार ५०० रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असून, आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.

0 टिप्पण्या