Hot Posts

6/recent/ticker-posts

" सरन्यायाधीश गवई यांच्या कुटुंबा तर्फे हल्ल्याचा निषेध व्यक्त "

 

सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि बहिण कीर्ती गवई यांनी भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून, आवाहन सुद्धा केले आहे. 




CJI Gawai's Mother And Sister Expressed Protest :- 


सरन्यायाधीश गवई यांच्या यांच्या वर हल्ला झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर चांगल्याच व्हायरल झाल्या असून, अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. अशातच सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि त्यांची बहीण कीर्ती गवई यांनी या प्रकरणावर निषेध नोंदवला आहे.



 




 काय म्हणाले मातोश्री आणि बहिण ?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक पद्धतीने देशाला संविधान सादर केले. परंतु, काही लोकं कायदा पायदळी तुडवून या देशात अराजकता पसरेल असे वागत असतात. असं वागायचं या देशात कुणालाही अधिकार नसून, तुम्हाला काही प्रश्न असेल. तर, कायदेशीर बाबी नुसार मांडण्याचे आवाहन करते आणि घडलेल्या घटनेचा निषध व्यक्त करते, असे सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी स्पष्ट केले आहे.
.



सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बहिण कीर्ती गवई म्हणाले,           " सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक स्तरावर झालेला नसून, संविधाना वरील हल्ला आहे. देशाचं संविधान श्रेष्ठ असून, संविधान सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. येणाऱ्या भावी पिढीला आपल्याला सुरक्षित भारत द्यायचा आहे. संविधान साठी आपण आता जे काही काम करणार असाल तर, संविधानाच्या चौकटीत राहून करा, " असे आवाहन कीर्ती गवई यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या