सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुनवाई दरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने अखेर हल्ला केल्याचे कबूल केले असून, या प्रकरणात माफी मागणार नाही असे सांगितले आहे.
Clarification of Accused who try to attack CJI :-
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण यांच्या वर जोड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा आरोपीने नुकतंच एक विधान केलं आहे. आरोपीचे नाव सुद्धा आता समोर आले असून, आरोपीचे नाव राकेश किशोर आहे. " सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णू प्रकरणावर सुनावणी दरम्यान टिप्पणी केली होती. टिप्पणी केल्या पासून मला दैव शक्ती झोपू देत नव्हती. त्यामुळे मी अशे कृत्य केले " असे आरोपीने मुलाखती मध्ये उत्तर देताना म्हटले असून, कबूल केले आहे.
![]() |
ANI या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखती मध्ये म्हणाले की, " घटना घडली तेव्हा मी पूर्णपणे शुद्धीवर होतो. सरन्यायाधीश गवई यांनी क्रिया केली आणि मी प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल मला भीती वाटत नसून, मला अजिबात पश्र्चाताप सुद्धा नाही. या घडलेल्या प्रकरणात मी माफी सुद्धा मागणार नसल्याचा म्हटले आहे.
माझे लायसेन्स रद्द करणे वकील कायद्याच्या (Advocate Act) कलम 35 चे उल्लंघन करत असून, जेव्हा एखाद्या वकील च्या विरोधात तक्रार येते. तेव्हा त्या प्रकरण विरोधात समिती बनवावी लागते. ती समिती नोटीस बजावत असते. दिलेल्या नोटीस वर ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे त्याला उत्तर द्यावे लागते. याला नैसर्गिक न्यायाचे तत्व असे म्हणतात असेही आरोपी राकेश किशोर म्हणाले.
कालच सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल ने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी चे वकीलीचे लायसेन्स तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेत देशातील कुठल्याही न्यायालय मध्ये वकिली ची प्रॅक्टिस करू शकणार असा निर्णय घेतला आहे.

0 टिप्पण्या