सरन्यायाधीश गवई यांच्या वरील हल्ल्या प्रकरणी विरोधकांनी निषेध नोंदवला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हा हल्ला भाजपने घडवल्याचा दावा केला आहे.
Opposition protests Against Chief Justice Attack Case :-
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाने सुनावणी दरम्यान जोडे फेकून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, तेथील सुरक्षा रक्षकांनी वेळीच धरले आणि त्याला न्यायालयाच्या बाहेर घेऊन जाऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. घडलेल्या घटने वरून आता समाज माध्यमां वर चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. आता यात राजकीय मंडळीची भर पडली असून, विरोधकांनी या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे. एक्स वर पोस्ट लिहीत त्यांनी निषेध नोंदवला.
सुनावणी दरम्यान ही घटना घडली तेव्हा न्यायालयात तणावाची परिस्थिती काही वेळासाठी निर्माण झाली होती. सरन्यायाधीशांच्या आवाहना नंतर न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली.
काय केला संताप व्यक्त?
आज सर्वोच्च न्यायालयात भारताच्या माननीय सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न अभूतपूर्व, लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. हा आपल्या न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि कायद्याच्या राज्यावर हल्ला असून, अशा निर्लज्ज कृत्याने गेल्या दशकात आपल्या समाजाला कसे द्वेष, धर्मांधता आणि धर्मांधतेने ग्रासले आहे हे दर्शविते, असे एक्स वर पोस्ट करत काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निषेध नोंदवला आहे.
सरन्यायाधीश यांच्या वर हल्ल्याचा केला गेलेला प्रयत्न हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधाना वरील हल्ला असून, भाजप तर्फे हा हल्ला करण्यात आला असल्याचा दावा शिव सेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा डॉ आंबेडकर आणि संविधानावरील थेट हल्ला आहे!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 6, 2025
हल्लेखोर बेगडी हिंदुत्ववादी आहेत
भाजपच्या प्रशिक्षण केंद्राची ही निर्मिती आहे!
@RSSorg
@BJP4India
@narendramodi pic.twitter.com/eqn3UiAgNh
लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवाद न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तीं वरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्याय व्यवस्थेचा नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे. त्यामुळे या घटनेचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी एक्स वर पोस्ट केली आहे.

0 टिप्पण्या