Hot Posts

6/recent/ticker-posts

" सरन्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाचा हल्ला करण्याचा प्रयत्न "

 

    सर्वोच्च न्यायालयात आज सोमवार रोजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. यादरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन न्यायालयाला केले. 



Advocate Try to Attack On CJI Gawai :- 


सर्वोच्च न्यायालयात वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश भूषण गवई सुनावणी सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. सरन्यायाधीशांवर हल्ला करत असतानाच त्याला न्यायालयातील सुरक्षा रक्षकांनी पकडून बाहेर नेत असताना वकिलाने "सनातन का अपमान नहीं सहेंगे" अश्या प्रकारच्या वल्गना दिल्या. त्यामुळे काही वेळा साठी न्यायालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या त्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस त्या घटनेची चौकशी करत आहेत. 

       याप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायालयातील वकील आणि कर्मचाऱ्यांना नरमाईची भूमिका घेत म्हणाले की, " विचलित होऊ नका, आम्ही विचलित झालेलो नसून, अश्या घटनांचा माझ्यावर परिणाम होत नसतो." 




Photo Source Mathurbhumi Company 




              नेमकं काय आहे प्रकरण? 


मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिरातील भगवान विष्णूच्या सात फूट उंच याचिका फेटाळत असताना टिप्पणी सरन्यायाधीश गवई यांनी केली होती. ती टीका समाज माध्यमां वर व्हायरल झाली होती. " जा आणि देवालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात. त्यामुळे आता जा आणि प्रार्थना करा." अशी टीका त्यांनी केली होती. नेमकं याच टिके प्रकरणी हा हल्ला केला असल्याचे माध्यमां मध्ये चर्चा आहे. 

       

  

  सरन्यायाधीश गवई आधीच प्रतिक्रिया                        दिली होती 


   सरन्यायाधीश गवई यांनी या प्रकरणावर आधीच प्रतिक्रिया देत खुलासा केला होता. मी सर्व धर्माचा आदर करतो अशी प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त लाईव्ह लॉ आणि बार अँड बेंच या वृत्त संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना हे प्रकरण इथेच थांबले असे वाटले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या