" सोनम वांगचूक अटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस "

 

सर्वोच्च न्यायालयाने कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटक प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, उच्च न्यायालय मध्ये धाव का घेतली नाही असा सवाल याचिकाकर्त्यांना केला आहे. 



Supreme Court Issued Notice Central Govt. :-

लद्दाख चे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या रासुका (NSA) कायद्या अंतर्गत अटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.  न्यायाधीश अरविंद कुमार आणि न्यायाधीश एन. वी. अंजारिया यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे.








 सध्या सोनम वांगचुक जोधपूर तुरुंगात असून, त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात हाबीस कॉर्पस (Habeas Corpus) नावाची याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली. वांगचुक यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लढा दिला.

         सोनम वांगचुक यांची तुरुंगातून सुटका करून त्यांना     न्यायालया समोर तत्काळ हजर करावे, त्यांना दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटण्याची परवानगी द्यावी आणि तुरुंगात त्यांना औषधे, कपडे, अन्न आणि इतर मूलभूत गरजा पुरवल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी दाखल याचिके मध्ये केली.


                       

         काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?


सरकारने केलेल्या अटक विरोधात उच्च न्यायालयात धाव का घेतली नाही? त्यावर याचिका कार्त्यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले केंद्र सरकारने आदेश दिला असून, कुठल्या उच्च न्यायालय मध्ये धाव घ्यायला पाहिजे असे विचारले. पुढील सुनावणीला या प्रश्नाचे उत्तर न्यायालयाला द्या असे याचिका कर्त्यांना म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या