वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Prakash Ambedkar's Letter To the CM. Fadanavis :-
राज्यात काही जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती असून, सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब मदत जाहीर करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत काही मागण्या केल्या आहेत.
काय आहेत मागण्या ?
संपूर्ण राज्याला ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत म्हणून जाहीर करावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी. नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता सरकारने तातडीने आर्थिक मदत शेतकऱ्यांना ताबडतोब करावी.
महाराष्ट्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जनावरे सुद्धा पुरात वाहून, दगावले आहेत. सतत झालेल्या अतिवृष्टीने शेतकरीच संकटात सापडला नसून, गावातील लहान मोठे व्यावसायिक, कारागीर आणि शेतमजूर देखील या महापुरामुळे संकटात सापडला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी असून, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांकडून वसूल केलेला १२ टक्के पैसे कधी कामात येतील असा सवाल करत, मोठ मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ करताना त्यांना कुठलेही अटी शर्ती लावल्या जात नाहीत. मग शेतकऱ्यांना वेगळा न्याय का लावत आहात असा सवाल आंबेडकरांनी पत्र लिहीत केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्याला ३० टक्के महसूल शेतकऱ्यांकडून मिळतो. आजच्या अस्मानी संकटात सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने शेतकऱ्यांना हा दिलेला धोका आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 29, 2025
याविषयी लक्ष वेधण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना पत्र लिहून… pic.twitter.com/hqGpboxLkF

0 टिप्पण्या