Hot Posts

6/recent/ticker-posts

" अभिनेते संकर्षण कऱ्हाडे पूरस्थिती मुळे भावुक " " मदतीचे केले आवाहन "

 




अभिनेते संकर्षण कऱ्हाडे मराठवाड्यातील पूरपरिस्थिती वरून भावुक झाले असून, त्यांनी चाहत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या बँक अकाउंट डिटेल्स वर मदतीचे आवाहन केले आहे. 


Actor Sankarshan karhade Emotional :- 

राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्यामुळे गावंच्या गावं पाण्याखाली गेले असून, शेतकरी, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने मराठवाडा व सोलापूर जिल्हा पुराच्या विळख्यात सापडला आहे. 



Photo Source Hindustan Times Media Company.



     पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, त्यामुळे गावा-गावातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अशातच आता मराठी सिने अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी व्हिडिओ शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे. 

           संकर्षण कऱ्हाडे म्हणतात, " मी मराठवाड्यातील परभणीचा असून, मला बातम्यांच्या माध्यमातून पूरपरिस्थिती बाबत माहिती मिळाली. शेतात ज्याप्रकारे कमरे इतकं पाणी शिरलं असून, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकं पाण्याखाली गेलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास नाहीसं झालेलं आहे. परंतु, मी सध्या मराठवाड्यात येऊन मदत करू शकत नाही. म्हणून मी परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी मला नंबर दिला असून, मी माझ्याकडुन फुल न फुलाची पाकळी देत आहे." 

     विडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कऱ्हाडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. " माझ्या मराठवाड्यासाठी... माझ्या परभणी साठी... थोडा संयम ठेवा... पुढच्या वर्षी हेच पाणी साथ देईल ... त्रास देणार नाही.." असे लिहत मराठवाड्याला धीर दिला आहे. " 

  चाहत्यांना सुद्धा त्यांनी मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आयडी वर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला अकाउंट नंबर शेअर केला आहे. जमेल तितके पैसे त्या अकाउंट नंबर वर पाठवण्याचे आवाहन अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी केले आहे.  

     

          

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या