राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई उपस्थित राहण्याची बातमी समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली होती. आता ती बातमी धाद्दांत खोटी असल्याचे कमलताई गवई यांनी देशाला उद्देशून पत्र लिहिले आहे.
Kamaltai Gawai Clarification On RSS Ceremoney :-
साधारण दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर सरन्यायाधीश (CJI) भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या अमरावती येथील विजयी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी दिले होते. त्यावर आंबेडकरी समजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यावर आता कमलताई गवई यांनी स्पष्टीकरण दीले . ती बातमी खोटी असल्याचे कमलताई गवई यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
![]() |
| Photo Source Loksatta Media Company. |
काय दिले स्पष्टीकरण ?
" राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यास माझी उपस्थिती राहण्याची बातमी खोटी असून, आंबेडकरी विचाराने ओतप्रोत व देशाच्या संविधाना प्रती माझे घराणे निरंतर प्रामाणिक असल्याने मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सोहळ्यास अजिबात हजर राहणार नाही, सामाजिक भावनेला कुठल्याही प्रकारे दुःखी होऊ देणार नाही. त्यामुळे सदरचे निमंत्रण मी स्वीकारत नाही. " असे स्पष्टीकरण कमलताई गवई यांनी दिली.
१९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमी दिनी करण्यात आली. त्यामुळे २०२५ म्हणजेच या वर्षी आरएसएस ला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे. यानिमित्ताने नागपुरात होणाऱ्या सोहळ्यास देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, अमरावती येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच ऑक्टोबर च्या सोहळ्यास सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे अनेक माध्यमांचे वृत्त होते. आता ते वृत्त कमलताई गवई यांनी फेटाळले आहे.


0 टिप्पण्या