Hot Posts

6/recent/ticker-posts

" भाजप सोबत असणाऱ्या पक्षा सोबत जाणार नाहीच सुजत आंबेडकर म्हणाले "

 

  वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी युती बाबत मोठं भाष्य केलं आहे. युतीसाठी त्यांनी अट ठेवली आहे.



Sujat Ambedkar Press Conference :- 

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत आमचे वैचारिक विरोध असल्याने, भाजप सोबत युतीत असणाऱ्या पक्षासोबत आम्ही जाणार नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. 








          मविआच्या घटक पक्षांनी खात्री द्यावी 


महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचे निवडून आलेले सदस्य भाजप सोबत जाणार नाही याची खात्री द्यावी. तरच, आम्ही महाविकास आघाडी सोबत जाण्यास तयार आहोत. 


  वंचित समूहांना प्रतिनिधित्व देण्याचा आमचं प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांचा निवडणुका असून, कार्यकर्ते च पक्षाचे कार्यकर्ते निवडणुका लढवणार आहेत. आता पर्यंत ज्या समुहांची नावे कुणीच एकली नव्हती. त्या समूहांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचा पक्ष प्रयत्न करत आहे. 


              काँग्रेसने वंचित चा मुद्दा चोरला

  चेतन अहिरे विरुद्ध निवडणूक आयोग याचिका वाचण्याचा सल्ला पत्रकारांना देत म्हणाले, काँग्रेसने वोट चोरीचा मुद्दा लढवण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात लढवला. काँग्रेस कधी पासून वंचितचे मुद्दे लावून धरणे थांबवणार आहे, असा सवाल आंबेडकरांनी केला. 


     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या