Hot Posts

6/recent/ticker-posts

वकिली व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांनो तयारीला लागा " " ऑल इंडिया बार एक्सामीनेशन ची तारीख जाहिर "

 


 

" ऑल इंडिया बार एक्झामिनेशन " ची बार काऊन्सिल ऑफ इंडिया ने तारीख जाहिर केली आहे. कधी होणार परीक्षा? काय आहे पात्रता? घ्या जाणून. "


 


All India Bar Examination 2025 :- 


वकिली व्यवसायाचे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेकांचं स्वप्नं असतं की मी वकील बनून अनेक गरीब शोषित आणि पीडित लोकांच्या वर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळवून द्यायचे. आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे. परंतु, त्यासाठी तुम्हाला परिश्रम घावे लागणार आहे. न्यायालयात वकील म्हणून उभं राहून युक्तिवाद करण्यासाठी दरवर्षी एकदाच परीक्षेचं आयोजन करण्यात येते. ऑल इंडिया बार एक्सामिनेशन (AIBE) असं या परीक्षेचं नाव आहे. या परीक्षेची तारीख, नोंदणी करणे व शेवटची तारीख जाहीर केली आहे. 

 




      





      

          काय आहे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ? 

अखिल भारतीय बार परीक्षा (AIBE) ज्याने वकिली व्यवसायातील शिक्षण पूर्ण केलं आहे. ही परीक्षा दरवर्षी बार काऊन्सिल ऑफ इंडिया व्दारे आयोजित केली जाते. नवीन वकिलांना कायद्याचे आणि कायदेशीर प्रक्रियांचे मूलभूत ज्ञान असावे यासाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा पास झाल्या नंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रॅक्टिस प्रमाणपत्र मिळतो. जेणेकरून, तो देशभरातील कुठल्याही न्यायालयात वाकीलीला सुरुवात करू शकतो. 

                    

            कधी होणार आहे परीक्षा ? 


कुठल्याही परीक्षेला बसण्या अगोदर त्या संबंधित परीक्षे करिता नोंदणी करावी लागते. तसंच या परीक्षेला सुद्धा नोंदणी करावी लागणार आहे. या परीक्षेची नोंदणी २९ सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. तर, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. तर, प्रवेशपत्र 15 नोव्हेंबर रोजी मिळणार असून, परीक्षा ३० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

   परीक्षेत बसण्यासाठी टक्केवारी किती पाहिजे ? 


 ऑल इंडिया बार एक्झामीनेशन (AIBE) मध्ये अर्ज करण्यासाठी सामान्य (Gen.) किंवा ओबीसी साठी ४५% आणि अनु. जाती., जमाती आणि अपंग उमेदवारांना ४० टक्के परीक्षेत अर्ज करण्यासाठी लागते. 

            

          परीक्षेत अर्ज करण्यासाठी पात्रता काय? 


   ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) मध्ये तीन वर्षाच्या शेवटच्या सत्रात असलेले व पाचव्या वर्षाच्या शेवटच्या सत्रात असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. परंतु, त्यांचे तिन्ही वर्षाचे एकाच वेळेस पास झालेले असावे. म्हणजेच एखाद्या सत्रात जर नापास असाल तर संबंधित व्यक्ती अपात्र ठरणार आहे. तीन वर्षाचं आणि पाच वर्षाचं कायद्याचं शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या