वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी १ ते ४ तारखे दरम्यान आंबेडकरी अनुयायांना टोल माफ करण्याच्या मागणी वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Adv. Prakash Ambedkar Demands Toll Free For Buddist Community :-
दीक्षाभूमी नागपूर, औरंगाबाद बौद्ध लेणी तसेच अकोला व इतर ठिकाणी लाखो अनुयायी प्रवास करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टोल वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या बौद्ध अनुयायी करिता धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त १ ते ४ ऑक्टोंबर दरम्यान टोल माफ करण्याची मागणी करणारे पत्र लिहत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केली.
![]() |
| Photo Source Hindustan Times Media Group |
विजयादशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर ला नागपूर येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या जनतेस धम्मदीक्षा दिली. हा दिवस जगभरातील बौद्धांसाठी सन्मानाचा आणि मुक्तीचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरवर्षी विजयादशमी दिनी देशभरातून लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी नागपूर दीक्षाभूमी आणि बौद्ध लेण्या आणि इतर ठिकाणी भेटी देतात. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात टोल जनते कडून वसूल केला जातो. ज्याचा अनुयायांना या दिवशी टोल वसुलीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या अनुयायांना टोल मुक्ती करावी.


0 टिप्पण्या