Hot Posts

6/recent/ticker-posts

" राहुल गांधी पुन्हा विदेश दौऱ्यावर " " भाजपाचा जोरदार हल्लाबोल "

 

राहुल गांधी विदेशी दौऱ्यासाठी रवाना झालेले असून, भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 



Rahul Gandhi Departs South America :- 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी हे अजून विदेश दौऱ्यावर गेले असून, ते दक्षिण अमेरिकेतील चार देशांचा दौरा करणार आहेत व तेथील राजकीय नेते , विद्यापीठातील विद्यार्थी आणि व्यापारी वर्गा सोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती काँग्रेस चे नेते पवन खेडा यांनी दिली.


त्यांचा या महिन्यातील हा विदेशातील दुसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी मलेशिया मध्ये दौरा केल्याचे वृत्त आहे. याबद्दल काँग्रेस कडून अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. परंतु, समाज माध्यमांवर त्यांचे फोटो व्हायरल झाले . भाजप नेते अमित अमित मालवीय यांनी मलेशिया यात्रेवरून राहुल गांधींवर टीका केली होती.



Photo Source Siasat.com


 

राहुल गांधी विदेशी दौऱ्यासाठी रवाना झाले असून, ते बऱ्याच कार्यक्रमात उपस्थित राहतील अशी माहिती काँग्रेस नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या एक्स वर पोस्ट लक्रत दिली. परंतु, ते किती दिवस विदेशातील दौऱ्यावर असणार याबद्दल अधिकृत माहिती पवन खेडा यांनी दिलेली नाही.

" राहुल गांधी दक्षिण अमेरिकेसाठी रवाना झालेले असून, बंद दाराआड कोणाशी भेटतील याबद्दल आश्चर्य वाटते. भूतकाळात, त्यांनी भारतीय लोकशाहीत परकीय हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. तर,  इल्हान उमर सारख्या भारत विरोधी घटकांना त्यांनी भेट दिली. खलिस्तानी दहशतवादी पन्नूला ही मान्यता मिळाली आहे. परंतु, त्यांचे वैचारिक अराजकतावादी सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत अटक करताच राहुल गांधी विदेश दौऱ्यावर निघाले," अशी टीका प्रदीप भंडारी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या