खासदार विशाल पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला २८ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या परीक्षे प्रकरणी प्रश्न विचारत धारेवर धरले आहे.
Vishal Patil Asks MPSC :-
सध्या देशभरात पावसाने हाहाकार माजवला असून, राज्यात मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. अशातच महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचे २८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षे वरुन आता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
मराठवाडा व विदर्भातील पूरसदृश्य परिस्थिती असून, अनेक भागात गावे पाण्याखाली गेले आहेत. अश्या परिस्थितीत अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबा समवेत नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असून, २८ सप्टेंबरला होणारी परीक्षा इतकी महत्त्वपूर्ण आहे का? असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी केला आहे.
काही दिवसां पूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) यांनी पूरपरिस्थिती ची माहिती घेऊन परीक्षा पुढे ढकलली असून, २८ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या भविष्याशी का खेळत आहे असा सवाल करत, तत्काळ राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
0 टिप्पण्या