शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केली आहे.
Vanchit Bahujan Aghadi :-
राज्यात सगळीकडे पावसाने थैमान घातले असून, काही जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक गावं आणि लगतची शेती पाण्याखाली गेली असून पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहेत. ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी वंचित बहुजन आघडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केली आहे.
![]() |
| Photo Source Utkarsha Rupwate X (Formerly Twitter) Account |
हाती आलेलं पिकं डोळ्या समोरून वाहून गेल्याने त्याच्या पदरी निराशा पडलेली असून, पावसाचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे. याआधी अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला. त्याचे पंचनामे पूर्ण झाले. परंतु, आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली गेली नाही. परंतु, आता तरी सरकारने ही प्रक्रिया जलद करून शेतकऱ्यांना पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे उत्कर्ष रूपवते म्हणाल्या.
शेतकऱ्यांना घराच्या किंवा शेताच्या बाबतीतील मदत सरकार कडून त्वरित केली जावी. सरकारच्या वतीने निवडणूक अभियान दरम्यान आम्ही कर्ज माफी करू. आम्ही तुमचा कागद कोरा करू अश्या वल्गना केल्या. १.५ वर्षाच्या नंतर सुद्धा या सरकारने कर्जाफी केलेली नाही. आता हीच कर्जमाफी करण्याची योग्य वेळ आहे, असेही उत्कर्षा रूपवते म्हणाले.
अती पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे. पंचनामे करून शासनाने तात्काळ नुकसानभरपाई द्यावी
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 25, 2025
आता तरी सरकारने जागे व्हावे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्याठिकांनचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून अति पाऊस… pic.twitter.com/Q6WTdKoM5k

0 टिप्पण्या