सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होण्याचा एक पायंडाच पडलेला आहे. विडिओ अपलोड झाल्या नंतर त्याला व्हायरल व्हायलाही वेळ लागत नाही. असाच काही शाळकरी मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ बघून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडिओ मध्ये पाच मुलं आणि दोन मुली दिसत आहेत. त्यांना बिस्कीट चा एक खेळ खेळायला दिला जातो. ज्यात त्यांच्या माथ्यावर बिस्कीट ठेवल्या जाते आणि त्यांना बिस्कीट ला हात न लावता खाण्याची अट घातली जाते. पहिल्या भागात दोन मुलांच्या माथ्यावर बिस्कीट ठेवलं जातं. त्यानंतर ते खेळ खेळायला सुरुवात करतात. तेव्हा दोघांच्याही डोळ्यावर ते बिस्कीट पोहचते. पहिला मुलगा बिस्कीट डोळ्यावर येते तेव्हा तो डोळे मिचकवत बिस्कीट खाली उतरवतो. तेव्हाच दुसरा मुलगा हात न लावताच बिस्कीट खाण्यात यशस्वी होतो. ते बघून पहिला मुलगा गाडबतो. ज्यामुळे तो बिस्कीट ओठा जवळ येताच बिस्कीटला हात लावतो.
दुसऱ्या भागात एका मुलीला हाच खेळ दिला जातो. तिच्या मुखा वर हे बिस्कीट पोहचते. परंतु, तोंड जास्त उघडल्याने हे बिस्कीट खाली पडते.
तिसऱ्या भागात एक मुलगी आणि मुलगा आहे. जे या खेळाचे भाग असतात. मुलीच्या माथ्यावर बिस्कीट असते आणि मुलाच्या माथ्यावरून ते बिस्कीट खाली डोळ्यावर उतरते. डोळ्या वरून हे बिस्कीट त्याच्या मुखा पर्यंत येते. त्यानंतर ते बिस्कीट त्याच्या खांद्यावर पडते. त्या मुलाचे एक्स्प्रेशन बघून तुमचे हसून हसून पोट दुखेल.
भन्नाट न्यूज ने फेसबुक वर हा विडिओ अपलोड केला आहे. ज्याला 1K Likes आणि 9 कॉमेंट्स केल्या आहेत.

0 टिप्पण्या