शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान



ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार शुक्रवारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या उपस्थितीत राम सुतार यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला.




महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ :- 


महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान "महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४" यंदा प्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते शिल्पकला क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि खासदार महेश शर्मा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिल्पकार सुतार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान केला. 




Photo Source DGIPR Twitter Account 

 






        कोण आहेत राम सुतार?


 
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. आज पर्यंत त्यांनी जवळपास दोनशे हून अधिक शिल्प पाचही खंडात बनवली आहेत. मूळचे ते महाराष्ट्राचे असून, त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदुर या गावी एका गरीब कुटुंबात झाला. मुंबई मधील जे. जे.आर्ट्स कॉलेज मध्ये शिल्पकलेची पदवी राम सुतार यांनी १९५२ मध्ये मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्व खात्या मध्ये नोकरीला सुरुवात केली. अजिंठा वेरुळ लेणी मधील खराब झालेल्या शिल्पाचे डागडुजी करण्याचे काम राम सुतार यांनी त्यावेळी केले.



संसदेच्या परिसरात असलेले महात्मा गांधी यांचे १६ फूट उंच शांत मुद्रा मध्ये असलेला पुतळा त्यांचीच निर्मिती आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १८ फूट, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे शिल्प साकारण्या मध्ये त्यांच फार मोठं योगदान आहे.








आता पर्यंत मिळालेले पुरस्कार


केंद्र सरकारच्या वतीने त्यांचा १९९९ मध्ये "पद्मश्री" पुरस्कार देऊन  त्यांचा सत्कार करण्यात आला. तर, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचा "रूपधर जीवनगौरव पुरस्कार" २०१० साली त्यांना प्रदान करण्यात आला. टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार २०१६ भारत सरकार तर्फे 2018 ला त्यांना प्रदान करण्यात आला.


साधारण सात महिन्या पूर्वी सभागृह मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पकार राम सुतार यांच्या नावाची घोषणा केली होती. मुंबई मधील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प व अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प त्यांच्याच वतीने साकारण्यात येत आहे.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या