Hot Posts

6/recent/ticker-posts

"शरद पवार भाजपचे हस्तक :- प्रकाश आंबेडकर "शरद पवार यांच्यावर केला हल्लाबोल"

 


शरद पवार भाजपचे हस्तक असल्याचा आरोप करत, पुढील 15 दिवसांत मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वंचित चे प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली.






पंढरपूर :- 

        देशातील पातळी वर खेळणारी माणसं वेगळी असून, लोकांच्या समोर खेळणारी माणसं वेगळी आहेत. पुढील पंधरा दिवसांत राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याचे संकेत त्यांनी दिले. शरद पवार भाजपचे हस्तक असून त्यामधून ते कधीच बाहेर पडू शकत नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

     

    विरोधकांना राजकीय लकवा मारला असून, VVPAT शिवाय आम्ही निवडणुकीत भाग घेणार नाही, VVPAT असेल तर आम्ही भाग घेऊ, तुमच्याकडे VVPAT नसेल. तर बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या. ही भूमिका विरोधकांनी घ्यावी. सर्वोच्च न्यायालय म्हणते की, VVPAT ने निवडणूक होणं आवश्यक आहे. आमच्या शिवाय अशी मागणी कोणी करणार नाही, असेही ते म्हणाले. 

  

आजपर्यंत झालेल्या पंतप्रधान नेहरू पासून ते मनमोहन सिंह यांच्या पर्यंत सुद्धा विदेशात गेले. परंतु, विदेशातील भारतीयांना एकत्र करून यापैकी कोणीच सभा भरवलेली नाही. भविष्यात विदेशात असलेल्यांनी, देशातील राजकारणात शिरकाव करायला लागली. तर आपल्या देशातील परिस्थिती बिघडू शकते. स्थानिक व्यक्ती राज्य करत असून तो राज्यकर्ता भविष्यात राहणार नाही. तर बाहेरून आलेला आपल्या वरती राज्य करेल. अशी जगातील कमी लोकसंख्या असलेल्या देशात भीती निर्माण झाली असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

       

        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या