लवकरच लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना 2100 रुपये देण्याची घोषणा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
नियमात न बसणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतःहून लाभ घेणे सोडलं तर उत्तम असेल, याबाबत सरकार स्वतःहून पुढाकार घेणार असून, शासन संपूर्ण कागदपत्रांची छाननी करणार आहे. नंतर ठरलेल्या नियमात बसत नसणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्या पासून वंचित कऱण्यात येणार आहे. नियमात बसत असणाऱ्यांना योजनेचा लाभ कायम राहणार असून, 2100 रुपये लाभार्थ्यांना लवकरच देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
लाडक्या बहीण योजनेची किश्त सरकार अस्तित्वात असे पर्यंत दिल्या जाईल असे सरकारने ठरवले आहे. परंतु, नियमात असेल त्यांनाच देण्यात येईल. सरकारने 2100 रुपयांचा शब्द दिला असून, सरकार सक्षम झाल्यानंतर आम्ही तोही शब्द पूर्ण करू असेही, मंत्री बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
योजना आहे तरी काय ?
सरकारी योजने तर्फे 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यामध्ये दिले जाते. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा यामागील उद्देश आहे. २४ जून २०२४ ला या योजनेची सुरुवात झाली. तत्कालीन मुख्यमंत्री व अताचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची सुरुवात केली. गुड रिटर्न्स वृत्तानुसार, "मध्य प्रदेश सरकारने "लाडली लक्ष्मी योजना" सुरू केली होती". त्यांचे अनुकरण करत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात राबवली.

0 टिप्पण्या