यंदाचे रक्षाबंधन पोलिसांसोबत साजरा करण्याचे प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचे आणि अरुंधती शिरसाठ यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन.
मुंबई:-
वंचित बहुजन महिला आघाडी च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन अकरा ऑगस्ट व बारा ऑगस्ट ला महिला आणि पुरुष पोलिसांना मानवी हक्कांचे रक्षण करण्याची व कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने भगिनि भाव ठेऊन राखी बांधावी, असा आदेश वंचित बहुजन महिला आघाडी चे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
स्त्री पुरुष समतेच्या नुसार वाटचाल करत करत असल्याने महिला अबला असतात असे आम्ही मानत नसून, भावांनीच बहिणींचे रक्षण करावे ही भावनाच चुकीची आहे. भाजपाचे सरकार भारतीय संस्कृतीच्या नावावर मोठया प्रमाणात संस्कृतीचे उदात्तीकरण करते. असा आरोप रेखा ठाकूर यांनी केला.
आपला समाज राखी पौर्णिमा साजरा करत असला तरी काही भाऊ रक्षक बनण्या ऐवजी भक्षक बनतो, पुणे येथील पोलिस खात्यातील कर्मचारी महिलांशी दादागिरीने वागले असून, न्याय मागायला आलेल्या स्त्री पुरुष नागरिकांशी बंधुभावाने वागले नाहीत, असा आरोप करत, स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल. तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधून पोलिसांना भाषा समजेल, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडी कडून समाज माध्यमां वर पत्रक जाहीर करत म्हणाले.


0 टिप्पण्या