Hot Posts

6/recent/ticker-posts

"ओबीसी श्रीमंत मराठ्यांचा विरोधात जाण्याची दाट शक्यता" :- प्रकाश आंबेडकर "

 




शरद पवार यांच्या मंडल यात्रे मुळे ओबीसी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाहीत अशी व्यवस्था शरद पवार निर्माण करत आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. 



वंचित बहुजन आघाडी : 

   

   श्रीमंत मराठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आधार असून, शरद पवार यांच्या पक्षाच्या सुरू असणाऱ्या मंडल यात्रे मुळे ओबीसी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाणार नाही हाच राजकीय हेतू असून, शरद पवार यांच्या पक्षाचं ओबीसिंच कल्याण व्हावं हा हेतू नाही. या कारणाने ओबीसी श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जाण्याची दाट शक्यता असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

    ओबीसी समाजाने मागच्या निवडणूकीत बिजेपीला मत दिले. परंतु, आता ओबीसींच्या लक्षात आले आहे की, "एक सापनाथ आहे, तर एक नागनाथ आहे". दोन्ही पक्षात उमेदवारी श्रीमंत मराठा समाजाला दिली जाते. ओबीसींना उमेदवारी दोन्ही पक्षात दिली जात नाही. म्हणून ओबीसी मध्ये पुन्हा विचार करण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी केला. 

        

      




    राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्हाडी पाठीमागून घोडे 

 

 निवडणूक प्रक्रिया पार पडल्या नंतर निवडणूक आयोगाने ७६ लाख मतदान झाली असं सांगितलं. आम्ही त्यावेळेस पक्षाच्या वतीने पत्र  या सगळ्या राजकीय पक्षांना लिहिलं. आपण सगळे मिळून कोर्टात जाऊ आणि कोर्टाला कळवू की, झालेलं मतदान पारदर्शक पद्धतीने झालेलं नसून, निवडणूक आयोगाला मतदारानेच मतदान केलेलं  आहे असे समजण्यासाठीच व्यवस्था तयार करण्यात आली होती,  त्या व्यवस्थेला पायदळी तुडवण्याचे काम निवडणूक आयोगाने केलं. त्यामुळे ही निवडणुकच रद्द करावी या मागणीसाठी पक्षाच्या वतीने उच्च न्यायलयात गेलो. परंतु, त्यावेळेस कोणीच आमच्या सोबत युक्तिवाद करण्यास न्यायालयात आले नाही. न्यायालय हे एकच व्यासपीठ असून, "जिथे दूध का दूध, पाणी का पाणी" होत असतं. दुर्दैवाने ते न्यायालयात कधीच गेले नाहीत आणि आता बोंबलत बसले असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस चे वर्हाती मागून घोडे असल्याची खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 


                      शरद पवार खोटे बोलत आहेत. 

शरद पवार म्हणतात की मी आणि माझ्या सोबत दोघे जन राहुल गांधी यांना भेटायला गेलो. त्या दोघांनी राहुल गांधी यांच्या शी चर्चा केली. त्या दोघे कोण होते असं पत्रकारांनी विचारताच त्या दोघांचं नाव विचारताच भेटायला आलेल्या दोघांचंही नाव आठवत नाही असं म्हणतात. तेव्हा माणसाने खोटं बोलावं तरी किती याला सीमा असते. 

        राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांना मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या घरी येण्या जाण्याची नोंद रोजही ठेवली जाते. त्यामुळे ते रेकॉर्ड बघून सहज तुम्ही नावे जाहीर करू शकता. सामान्य माणसाला फसवता येतं. परंतू, राजकीय कार्यकर्त्याला तुम्ही फसवू शकत नाही असेही ते म्हणाले.

       नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मंडल यात्रे निमित्त आले असताना त्यांनी विधान सभा निवडणूक होण्यापूर्वी दिल्ली येथे दोन व्यक्ती भेटायला आले आणि निवडणुकीत 160 जागा जिंकण्याची ऑफर दिली होती आणि त्यांची नावे आता माझ्याकडे नाही आहेत, असा गौप्य स्फोट शरद पवार यांनी 9 ऑगस्ट ला केला होता. शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना वंचीतचे प्रकाश अंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. 


         क्रिमिलेयर चा पक्षाच्या वतीने केला होता  विरोध 


  ओबीसींना राजकीय आणि शैक्षनिक सवलती मिळायला सुरुवात झाली. जे पक्ष आता मंडल आयोग च्या बाजूने लढत आहेत ज्या वेळेस क्रीमिलयेर ओबीसी मध्ये इंदिरा सहणी च्या केस मध्ये आणण्यात आला. त्यावेळेस शरद पवार यांच्या पक्षाने प्रशंसा केली आणि स्वीकारलं सुद्धा. त्यावेळेस ची भारिप बहुजन महासंघ आणि आताची वंचित बहुजन आघाडी ने विरोध केला होता. 

    विलासराव देशमुख त्याकाळात मुख्यमंत्री होते. त्या कालावधी  मंत्रिमंडळात आम्हीही होतो. त्यावेळेस ओबीसींच्या स्कॉलरशिप चा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. सत्तेत असताना कधीही  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्कॉलर ओबीसी मध्ये जे आहेत त्यांना स्कॉलरशिप आणि फ्रीशिप यासाठी पाठपुरावा केला नाही आणि  मंत्री मंडळात ओबीसींच्या हीतांचे निर्णय कधी घेतले नाहीत, असा आरोप शरद पवार यांच्या पक्षावर प्रकाश आंबेडकर यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या