उप राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्या पासून जगदिप धनखड गायब असल्याचा आरोप शिव सेना ऊ.बा.ठा. नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत आणि समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केला.
संजय राऊत / कपिल सिब्बल
राज्यसभा खासदार तसेच शिवसेना नेते संजय राऊत ऊबाठा गट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारत तोफ डागली आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? आपल्या माजी उप राष्ट्रपतींना नक्की झालं तरी काय? त्यांची तब्येत कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? देशाला या प्रश्नांची उत्तरे सत्यतेने जाणून घ्यायचे आहेत. असे प्रश्न संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहित विचारले.
आता ते गायब असल्याची चर्चा विरोधक करू लागले आहेत. याचं कारण राजीनामा दिल्या पासून ते कुठेच दिसत दिसत नसल्याचा, आरोप उ बा ठा गटाचे नेते संजय राउत यांनी केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे सभापती तसेच देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी पदावरून आरोग्याच्या कारणावरून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना राजीनामा दिला होता. तडकाफडकी दिलेल्या या राजीनाम्या मुळे व राजकीय घडामोडीत तर्क वितर्क लावण्यास सुरूवात झाली होती.
काय म्हणाले संजय राऊत ?
संसद सत्र 21 तारखेला सकाळी ११ वाजता सुरू झाले. तत्कालीन राज्यसभेचे सभापती म्हणून उप राष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सत्र सुरू ठेवला. त्या सत्रा दरम्यान राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी सभापती यांच्यात शाब्दिक चकमक घडली. त्यानंतर संसदेच पावसाळी सत्र दिवसभरा साठी तहकूब करण्यात आलं. याचा अर्थ असा आहे की, सभापतींची तब्येत बरी होती. त्याच दिवशी 6 वाजता च्या नंतर माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला, असं पत्रात त्यांनी लिहीलं.
पुढे म्हणाले की,"धनखड यांना त्यांच्या निवासस्थानी ठेवलेले आहे. परंतू, ते तिथेही सुरक्षित नाहीत अशी अफवा दिल्ली येथे पसरत आहेत, असा आरोप केला.
कपिल सिब्बल यांनी केली टीका
राजीनामा दिल्या पासून माजी उप राष्ट्रपती जगदिप धनखड कुठे आहेत? याची काहीच माहिती नसून, आता लापता लेडीज चा तर मला माहित होतं परंतू, लापता उप-राष्ट्रपती हे पहिल्यांदा ऐकत आहे. देशाच्या उप राष्ट्रपती पदी निवडून आल्या नंतर, त्यांनी अनेकदा सरकारची मदत केली. आता मला असं वाटतं आहे की विरोधी पक्षांना त्यांची सुरक्षा करावी लागेल. भारत हा लोकतांत्रिक देश असून, सरकारने त्यांची माहिती लोकां पर्यंत पोहचली पाहिजे, असा सल्ला समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी सरकारला दिला.

0 टिप्पण्या