मुंबई:-
सरकारची भ्रष्टाचार ही अपरिहार्यता झालेली असून, जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्याला सोबत घेऊन राज्य चालवायचं आणि भ्रष्टाचाऱ्यांना मोकळं सोडायचं. हा एककलमी कार्यक्रम झालंय का हा प्रश्न निर्माण होतोय. महाराष्ट्रात आंदोलन सुरू असताना दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा इंडिया आघाडीने काढला होता. त्याची दृश्य आज देशातल्या नाही तर जगतील लोकांनी पाहिला. परंतु, निवडणुक आयोगाला जाब विचारायला जात असताना इंडीया आघाडीच्या खासदारांना अटक कऱण्यात आली, म्हणून सरकारने केलेली कृती ही लोकशाहीला लागलेला बट्टा आहे, अशी टिका शिव सेना (ऊ.बा.ठा. गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथील शिवसेना भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे म्हणाले, "निवडणूक आयोग सोबत लढाई असून, भाजप आणि सरकार मध्ये का पडत आहे हे चित्र स्पष्ट झालं आहे. राहुल गांधी यांनी मतांची चोरी कशी झाली पुराव्यानिशी दाखवून दिल्या, नंतर सुद्धा निवडणूक आयोग राहुल गांधी यांना शपथ पत्र मागतो. बिहार मध्ये लाखो मतदारांची नावे वगळली असून, सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगतोय की, वगळलेली नावे आम्ही तुम्हाला द्यायला बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालया पेक्षा निवडणूक आयुक्त मोठे आहे का?" असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
"सर्वोच्च न्यायालया पेक्षा राष्ट्रपतींचे अधिकार घटनेत सर्वोच्च आहेत. भविष्यात राष्ट्रपती ने आदेश नाही दिला. तर, निवडणूक आयुक्त पदाला सर्वोच्च न्यायालयाच्या आणि राष्ट्रपती पदाच्या वर असलेले अधिकार आहे का? आम्ही तुम्हाला बांधील नाही असं निवडणूक आयोग म्हणत असेल तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. लोकशाहीची लढाई सरकार दाबून टाकत असल्याचा प्रयत्न संपूर्ण जगाने बघितलं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील लोकशाहीची सरकार दिवसाढवळ्या हत्या करत आहेत" असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
"पहलगाम हल्ला झाल्या नंतर विरोधी पक्ष सरकार सोबत देशासाठी उभा राहिला तसा पंतप्रधान यांनी देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करून देशासाठी आपण काय करू शकतो असं त्यांनी विचारण्याची अपेक्षा होती. परंतु, तसं न करता भाजप पक्षा वरील चोरीचे आरोप कसे लपवता येईल यासाठी केंद्र सरकारचा आटापिटा सुरू आहे" अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली.
देशात जे काही घडतंय हे तुम्हाला पटतंय का? असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये निवडणूक आयोगाने VVPAT काढलं असून, बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची आमची मागणी होती. VVPAT ठेवल्या नंतर त्यामधील चिठ्ठीची मोजणी आयोगाने केली पाहिजे. आता ते VVPAT पण काढून टाकलेलं आहे" अशी टिका शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

0 टिप्पण्या